Tuesday, September 27, 2016

एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
😗😗

एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
😍😍😍

एक गंमत सांगू तुला ....?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
😓😓😓😓

एक गंमत सांगू तुला .....?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
😵😵😵😵😵

एक गंमत सांगू तुला ......?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
😰😰😰😰😰😒😭

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.
👆👆👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...💐
💎💎💎...ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.


म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠😠😠

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴💵💷

आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏💏💏

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश
😂😂😂😂😂😂
म्हणाले तरी चालेल. 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.
💃💃💃💃💃
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण,👶👶👶👶

'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.🙏🙏🙏🙏🙏

Monday, September 26, 2016

Ganya is back

शाळेत english  चे lecture चालू असते ..
मास्तर _ :  गण्या ' it ' केव्हा वापरतात ??

गण्या _: घर बांधताना !!!!
🤔🤔😂😂😂😂😂

पत्नीच्या डोळ्यात पाणी होते...पति दवाखान्यात बेड वर शेवटच्या घटका मोजत असताना..

पति: मला माफ़ कर मी तुझे 1 लाख रुपये चोरले होते

पत्नी: अहो जाऊ दया

पति: तुझ्या कीमती साड्या मी चोरून माझ्या प्रेयसिला दिल्या होत्या

पत्नी: अहो जाऊ दया..

पति: तुझ्या घरच्यांशी मी खुप वाईट वागलो

पत्नी: अहो मी तुम्हाला माफ़ केले..

पति: मी तुला न सांगता माझ्या प्रेयसिला घेऊन महाबळेश्वर ला गेलो होतो

पत्नी: काही हरकत नाही, तुम्ही पड़ा बर शांत,
मीच तुम्हाला विष दिले आहे....आज सगळे हिशोब बरोबर चूकते होतील..
.
चुकीला माफी नाही

😝😝😝😝😝😝😝😝
लय भारी"जीवनात खूप हसा,
पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा.....

Sunday, September 25, 2016

*जाहीर निवेदन.*

खड्डयाच्या नावाने नागरिक विनाकारण ओरड करत आहेत,
खड्डयामुळे शहरात किती तरी उद्योगधंदे भरभराटीस आले आहेत आणि इतर ही फायदे आहेत त्याचा विचार करा.

1 ) खड्डयामुळे मानेचे बेल्ट , पाठीचे बेल्ट , कमरेचे बेल्ट , आयोडेक्स , झंडू बाम, व इतर वेदनाशामक औषधीची विक्री वाढली, आर्थोपेडिक्स डॉ कड़े प्लास्टर साठी रांग लागु लागली.

2 ) गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, रस्तोरस्ती गॅरेजच्या लोकांना रोजगार वाढला.

3 ) खड्डयामुळे लोकांचा राहदारीचा वेग कमी झाला , पर्यायाने घाई गड़बड़ न करता सावकाश काळजीपूर्वक चालायची सवय लागली . मन एकाग्र करण्यासाठी योगा करण्याची आवश्यकता नाही राहिली . फक्त खड्डयाचा  विचार केला की मन अगदी एकाग्र होते.

4 ) दररोज ऑफिस ला जाणा-यांना आजार पणाच्या सुट्यांमुळे का होईना कुटुंबा बरोबर वेळ घालवता येऊ लागला.

5 ) सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जवळपास जाण्यासाठी माणूस गाड़ी न वापरता पायीच चालू लागला,
त्यामुळे चालण्याचा व्यायाम तर होतोच पण .....
देशाच्या प्रगतीला आवश्यक असणारे इंधन बचत होऊ लागली .

आणि खड्डे कुठे नाहीत .......
खड्डे तर चंद्रावर सुद्धा आहेत .....
आणि प्रत्येक माणसाचे स्वप्न असते चंद्रावर जाण्याचे त्या साठी अगोदर सराव आवश्यक असतो .....
तेंव्हा आपला सराव चालू ठेवा उगाच नगर पालिकेला / सार्वजानिक बांधकाम विभागाला दोष देऊ नका ......

सार्वजानिक बांधकाम विभाग.

😂😂

अॅड़मीन साठी एक छोटीसी कविता
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
सोप नसतं राव
ग्रुप अॅडमीन होणं
आईच्या मायेने 
प्रत्येकाला सामाऊन घेणं

' लेफ्ट ' होतातच काही
कितीही रहा राईट
अॅडमीनला तेव्हा
खुप वाटतं वाईट

जरी त्यात त्याची
काहीच नसते चुक
तरी सुद्धा बिचा-याला
रहावं लागतं मुक

सर्वांचे हित त्याला
मनात धरावे लागते
ईच्छा नसली  तरी
एखाद्याला ' रिमूव ' करावे लागते

काही सन्माननीय सदस्य
कायम असतात गप्प
ग्रुपचा कारभार तेव्हा
होऊन जातो ठप्प

तरी सुद्धा त्याला
मुकाट्याने बसाव लागतं
ईच्छा नसली तरी
उगीच हसावं लागत.

प्रवास करावा आम्ही
त्याला भरावा लागतो टोल
चुकीच्या पोष्ट चे त्यालाच
चुकवावे लागते मोल

अल्प मतातील सरकार सारखं
त्याला निमुट बघावं लागतं
कितीही चढला पारा तरी
शालिनतेनं बघावं लागतं

स्वतः दुखःत राहून
वसवतो आनंदाचे गाव
माझ्या मते त्याचे
अॅडमीन ऐसे नाव

बाकी सब बकवास है.

अंधारलेल्या वाटे साठी
तारा असतो अॅडमीन
गुदमरणा-या जिवा साठी
वारा असतो अॅडमीन

रखरखणा-या वाळवंटातील
हिरवळ असतो अॅडमीन
अत्तराच्या कुप्पीतील
दरवळ असतो अॅडमीन

सुदाम्याच्या  मनाची
ओढ असतो अॅडमीन
शबरीच्या बोरासारखा
गोड असतो अॅडमीन

किलबिणा-या पाखरांचा
थवा असतो अॅडमीन
भळभळणा-या जखमेसाठी
दवा असतो अॅडमीन

कोकिळेच्या कंठातील
गित असतो अॅडमीन
यशोदेची हळवी
प्रित असतो अॅडमीन

कधी कधी फुल
कधी अंगार असतो अॅडमीन
लढणाऱ्याच्या शमशेरीची
धार असतो अॅडमीन

बहरणा-या प्रतिभेचा
श्रुंगार असतो अॅडमीन
सरस्वतीच्या गळ्यातील
हार असतो अॅडमीन

एक गोष्ट ध्यानात ठेवा
ऊगीच नसतो अॅडमीन
तुम्ही झोपी गेलात तरी
जागीच असतो अॅडमीन

कर्णा सारखं भरभरून
दान देतो अॅडमीन
बघा बरं किती मोठा
मान देतो अॅडमीन

तुमच्या हाती हुकुमाचं
पान देतो अॅडमीन
स्वतःच्या काळजात
स्थान देतो अॅडमीन

शब्दांच्या दरबारावर
पहारा देतो अॅडमीन
सारे सोडून जातात तेव्हा
सहारा देतो अॅडमीन

वा-यावर झुलणारं
पातं असतो अॅडमीन
जिवापाड जपावं असं
नातं असतो अॅडमीन

अजून काय लिहू ?
बाकी सारं काॅमन आहे
एवढंच म्हणतो शेवटी
अॅडमीनजी तुम्हाला नमन आहे...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

बंड्या बदाम विकत असतो..
एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??
बंड्या - डोकं चालतं
कस्टमर - कसं ?
बंड्या - एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर - माहीत नाही ..
बंड्या - हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती केळं असतात ??
कस्टमर - १२
बंड्या - बघितलं का,चाललं ना डोकं ..!
कस्टमर - २ किलो दे यार,लय भारी चीज आहे 😜😜😜😜😜😜😃😃😃😃😃😄😂

देशांतील नगरीक चिंतेत आहे की पाकिस्तान सोबत युद्ध झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेचे खुप नुकसान होईल...

यावर पवारसाहेबांनी पंतप्रधानांना प्रस्ताव दिला आहे...
की मी युद्धाचा सर्व खर्च करण्यास तयार आहे...बदल्यात मला फक्त पाक व्याप्त काश्मीरचा सात/बारा पाहिजे...

नादच खुळा
.
.
.
.
.
लवासा फेज-२ बनवणार...!!

😄😂🤓😜🤑👻

Blogger Widgets